Pimpri : यशवंत – वेणु पुरस्कार वितरण मंगळवारी चिंचवडला

रामदास फुटाणे व प्रभावती फुटाणे यांना यशवंत-वेणु पुरस्कार

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभागाच्यावतीने यशवंत-वेणु पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. यावर्षीचा यशवंत – वेणु सन्मान व्यंगकवी, पटकथा लेखक, चित्रपट निर्माते दिग्दर्शक कविवर्य रामदास फुटाणे व संस्कारक्षम गृहिणी प्रभावती फुटाणे यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली.

चिंचवड येथील अॅटो क्लस्टरमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दि. 12 मार्चला दुपारी तीन वाजता होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते पुरस्कार सोहळ्याचे उदघाटन होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. डी. पाटील असणार आहेत. तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे प्रणेते माजी आमदार उल्हास पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे असणार आहेत.

पिंपरीतील काकडे प्रॉपर्टीजचे संचालक कुणाल प्रकाश काकडे यांना यशवंतराव चव्हाण युवा उद्योजक पुरस्कार, सोमाटणे येथील माजी उपसरंपच सचिन मुऱ्हे, तर यशवंतराव चव्हाण सह्याद्री पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील ज्ञानगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ जगन्नाथ घोंगडे यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.