Pimpri : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा श्यामची आई आणि श्याम पुरस्कार कौसल्याबाई वसतकर, नागेश वसतकर यांना जाहीर

पोपटराव पवार यांच्या हस्ते बुधवारी होणार पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभाग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी यांच्या वतीने आणि पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, अखिल भारतीय नाट्य परिषद भोसरी यांच्या सहकार्याने देण्यात येणारे ‘श्यामची आई’ आणि ‘श्याम’ पुरस्कार यंदा अष्टविनायक ग्रुपचे नागेश वसतकर आणि त्यांच्या मातोश्री कौसल्याबाई वसतकर यांना जाहीर झाले आहेत.

पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी (दि. 6) रोजी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात दुपारी चार वाजता पार पडणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा आदर्शगाव प्रकल्प योजनाचे अध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून डॉ. श्रीपाल सबनीस उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी डी पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून महापौर राहुल जाधव, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित राहणार आहेत. यावेळी बाजीराव सातपुते यांचे ‘आईच्या संस्कारातून घडलेले साने गुरुजी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

  • पुरस्कार सोहळ्यात संत साई इंग्लिश मिडीयम स्कूल भोसरीचे संचालक शिवलिंग ढवळेश्वर यांना ‘साने गुरुजी विचार साधना पुरस्कार’ तर डायनॅमिक इंग्लिश मिडीयम स्कूल कडूस आणि पाईटच्या संस्थापक जयश्री गारगोटे आणि श्रीगोंदा तालुक्यातील विद्याधाम प्रशाला दैवदैठणचे श्रीराम बडवे यांना ‘साने गुरुजी संस्कारक्षम शिक्षक’ सन्मान देण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्याच्या संयोजनात प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, नारायण सुर्वे अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरीचे अध्यक्ष मुरलीधर साठे, रंगनाथ गोडगे, मुकुंद आवटे, अनिल कातळे, जयवंत भोसले, बाजीराव सातपुते, हनुमंत देशमुख, राजेंद्र वाघ, रोहित खर्गे, दिलीप वर्मा, मानसी चिटणीस, सुरेश कंक, अरुण गराडे आदींनी पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.