Pimpri: YCM मधील डॉक्टरांचे आंदोलन मागे, नगरसेवकाविरोधात FIR देण्याचे आयुक्तांचे आदेश

Behind doctors' agitation in YCM, commissioner orders to file FIR against corporator

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दादागिरी, शिवीगाळ केल्याचा आरोप करत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर, नर्सनी पुकारलेले काम बंद आंदोलन मागे घेत आपले काम सुरु केले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. त्यांच्या मागण्या मान्य केल्या. डॉक्टरांना अधिकची सुरक्षा देण्यात येणार आहे. तसेच संबंधित नगरसेवकाविरोधात एफआर देण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेचे वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित घोषित केले आहे. कोरोना बाधित रुग्णांवर या रुग्णालयात उपचार केले जातात. कोविड बाधित महिलेवर व्यवस्थित उपचार केले नाहीत.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी डॉक्टरांशी हुज्जत घातली होती. तसेच त्यांच्यात वादावादी झाली होती.

नगरसेवक वाघेरे यांनी शिवीगाळ, अरेरावीची भाषा केल्याचा आरोप करत वायसीएमच्या डॉक्टरांनी आज सकाळी कामबंद आंदोलन केले होते. तर, वाघेरे यांनी आपण शिविगाळ केली नाही. केवळ जाब विचारल्याचे सांगत आरोप फेटाळले होते.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, पालिकेतील पदाधिका-यांनी वायसीएमला भेट दिली होती. सायंकाळी पुण्यातील बैठक आटोपून आल्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनीही वायसीएमला भेट दिली. डॉक्टरांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या मागण्या मान्य केल्या. आयुक्तांच्या आवाहानाला प्रतिसाद देत डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले.

याबाबत बोलताना आयुक्त हर्डीकर म्हणाले, ”वायसीएममधील डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णाचे नातेवाईक, नगरसेवक यांच्याकडून काही चुकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा देण्याची त्यांची मागणी होती. त्यानुसार वायसीएमसाठी पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा घेण्यात येणार आहे.

पालिकेचा पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात येणार आहे. डॉक्टरांची कमतरता पूर्ण केली जाणार आहे. वायसीएममध्ये अतिरिक्त डॉक्टर, नर्सेस दिल्या जातील. डॉक्टरांची पगार वाढीची मागणी मान्य केली आहे.

त्यानुसार एप्रिल पासून पूर्वलक्षी प्रभावाने वेतनवाढ लागू केली जाणार आहे. प्रत्येक डॉक्टराला सरासरी दहा हजार वेतनवाढ दिली आहे. कालच्या प्रकरणाबात एफआयर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परवाच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.