Pimpri : वायसीएम रुग्णालयात रेबीज लसचा तुटवडा!

लस उपलब्ध करुन द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा युवासेनेचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात गेल्या आठवडाभरापासून रेबीज लसीचा तुटवडा जाणवत आहे. लस उपलब्ध करुन देण्याबाबत रुग्णालयाच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडे मागणी करुनही त्याचा पुरवठा केला गेलेला नाही. तसेच, गेल्या एक महिन्यांपासून रेबीज लसचा तुटवडा असल्याने अनेकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्वरीत रेबीज लस उपलब्ध करुन द्यावी, अन्यथा युवासेना पिंपरी विधानसभेने वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, वायसीएम रुग्णालयात भोसरी, चाकण, निगडी, पिंपरी, चिंचवड आदी परिसरातून उपचारासाठी नागरिक येतात.लस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी रुग्णालयाची आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तुटवडा जाणवत आहे. त्वरित रेबीज लस उपलब्ध करून द्यावी. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेना पिंपरी विधानसभेने दिला.

  • यावेळी जिल्हा समन्वयक रुपेश कदम, युवती सेना अधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, सनी कड, ओंकार जगदाळे, सूरज पवार ,रोहन पिसाळ, श्रेयस घुले, आदित्य पाटील आदी पस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.