Pimpri: केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकाकडून ‘वायसीएम’ची पाहणी; तयारी, उपाययोजनांबाबत समाधान

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असलेच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाची आज (शनिवारी) पाहणी केली. महापालिकेच्या तयारीचा आढावा घेतला. तयारी, केलेल्या उपाययोजनांबाबत केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले आहे.

राज्यात कोरोना विषाणु बाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा दोन दिवसीय दौरा पार पडला. या पथकाने महापालिकेत्या वायसीएम रुग्णालयाची पाहणी केली.

महापालिकेच्या तयारीचा आढावा घेतला. कन्टेंनमेंट झोन कसा काम करतो. महापालिकेने काय-काय उपाययोजना केल्या आहेत. महापालिकेने केलेली तयारी, उपाययोजनांबाबत केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले आहे. हे पथक केंद्र सरकारला माहिती देणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तयारीची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे उपस्थित होते.

यांचे होते पथक

केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त महासंचालक तथा केंद्रीय पथकाचे अध्यक्ष डॉ. पी. के. सेन, राम मनोहर लोहीया (आर.एम.एल.) रुग्णालयाचे वैद्यकीय तज्ञ तथा पथकाचे सदस्य डॉ. रोहित बन्सल, सफदरजंग रुग्णालयाचे भुल तज्ज्ञ तथा सदस्य डॉ. सौरभ मित्र मुस्तफी, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप औटी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर आदींनी महापालिकेच्या उपाययोजनांची माहिती घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.