Pimpri : रेल्वेतून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव रेल्वेतून पडल्याने जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी (दि. 21) सकाळी नऊच्या सुमारास पिंपरी एम्पायर इस्टेट जवळील लोहमार्गावर हा अपघात झाला.

प्रकाश दत्ताराम नारे (वय 23, रा.ठाणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी एम्पायर इस्टेटजवळ लोहमार्गावर एक तरुण जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती सोमवारी सकाळी पिंपरी लोहमार्ग पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. दुपारी एकच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्याकडे मिळालेल्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली.

नारे हा ठाण्यात एका बँकेच्या प्रोजेक्ट्वर तात्पुरत्या स्वरूपात कामाला होता. तसेच त्याचे काही नातेवाईक चिंचवड व पुण्यात राहतात. कामासाठी तो पुण्यात येत जात असे. प्रवास करत असताना रेल्वेतून पडल्याने अपघात झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.