Pimpri : दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्यास जाब विचारल्याने तरुणास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्यास (Pimpri) जाब विचारले असता, चौघांनी मिळून एका व्यक्तीस मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. 23) रात्री अकरा वाजता मोरवाडी येथे घडली.

चौघेजण दारू पिऊन एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्याचा एका महिलेस त्रास होत असल्याने महिलेचा भाचा शिवीगाळ करणाऱ्यांकडे गेला आणि जाब विचारला. यावरून चौघांनी तरुणाला लोखंडी पाईप आणि पंचने मारून जखमी केले.

कुंदन उमेश गायकवाड (वय 22, रा. मोरवाडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृष्णा कोत्तेलू, हनुमंत कोत्तेलू, अजय प्रधान, रॉबर्ट डिसोजा (सर्व रा. मोरवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi Burglary : प्राधिकरणात भर दिवसा घरफोडी; सव्वापाच लाखांचे दागिने लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी (Pimpri) दारू पिऊन एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्यामुळे फिर्यादी त्यांच्याकडे गेले आणि माझ्या मावशीला दारू पिऊन का त्रास देता अशी विचारणा केली. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लोखंडी पाईप आणि लोखंडी पंचने मारून जखमी केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारून ‘याचे कामच करू’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाण केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.