Pimpri : खूनी हल्ल्यातील जखमी तरुणाचा उपचारादम्यान मृत्यू

Young man injured in murderous attack dies during treatment ; कोयता, लोखंडी रॉड, दगड आणि काचेच्या बाटलीने केला होता हल्ला

एमपीसी न्यूज – मित्राला मारहाण केल्याच्या कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने कोयत्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादम्यान आज शनिवारी (दि.11) मृत्यू झाला. बुधवारी (दि. 8) लिंक रोडवरील पत्राशेड येथे ही घटना घडली होती.

करण महादेव पवार, असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अभिषेक संजय गायकवाड (वय 19, रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड) यांनी बुधवारी (दि.8) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

आबाशा ऊर्फ पृथ्वीराज कांबळे, आदित्य भोसले आणि त्याचे सहा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी अभिषेक गायकवाड हे मित्रांसोबत पत्राशेड परिसरात गप्पा मारत होते. त्यांचा मित्र करण पवार हा त्यांच्याकडे गप्पा मारण्यासाठी येत होता.

त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी “तू अमर चव्हाणच्या मित्राला मारतोस काय, आज तुला जिवंत सोडणार नाही, आज तुला मारूनच टाकतो, असे म्हणत आरोपींनी करण पवार याच्यावर कोयता, लोखंडी रॉड, दगड आणि काचेच्या बाटलीने हल्ला केला.

त्यात करण पवार गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णांलयात उपचार सुरु होते. मात्र, आज, शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like