Pimpri : लोकलच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – लोकल(ट्रेन)च्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास पिंपरी डेअरी फार्म जवळ घडली.

प्रतीक्षा गौतम माने (वय 20, रा. जय भीम नगर, दापोडी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पिंपरी डेअरी फार्मजवळ पुणे-लोणावळा लोकल(ट्रेन)ची धडक बसल्याने तरुणी गंभीर जखमी झाली.

तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.