Pimpri : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तरुणाला अटक

Youth arrested for molesting minor girl : आरोपी तरुणावर विनयभंग आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 19) सकाळी सहा वाजता नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

अरविंद रतन खंडागळे (वय 24, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सहाच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी घराच्या शेजारी असलेल्या टॉयलेटमध्ये प्रातःविधीसाठी गेली.

ती टॉयलेटमधून बाहेर येत असताना आरोपी तिथे आला. त्याने अल्पवयीन पीडित मुलीला टॉयलेटमध्ये ढकलून तिच्याशी लैंगिक अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला.

पोलिसांनी आरोपी तरुणावर विनयभंग आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल करत तरुणाला अटक केली आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.