Pimpri : शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुंडा (Pimpri) विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 30) सायंकाळी साडेसात वाजता मिलिंदनगर, पिंपरी येथे करण्यात आली.

करणसिंग उर्फ कल्ला चरणसिंग टाक (वय 20, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मयूर दळवी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंदनगर येथे एका तरुणाने बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगली असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत करणसिंग याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून दोन तलवार, एक कोयता आणि एक कुऱ्हाड अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Chinchwad : सराईत गुन्हेगारास लातूर मधून अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.