Pimpri : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी साडेतीनच्या सुमारास गांधीनगर पिंपरी येथील बसस्टॉप मध्ये घडली.

आकाश लक्ष्मण कांबळे (वय 26, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शनमन गायकवाड (वय अंदाजे 24), राहुल सुर्वे (वय अंदाजे 25, दोघे रा. गांधीनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गांधीनगर पिंपरी मधील वरदहस्त सोसायटी समोरील बस स्टॉपमध्ये बसले होते. आरोपी आणि त्यांची मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. आरोपी अचानक आकाश यांच्याजवळ आले आणि त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यात कठीण वस्तू मारून त्यांना जखमी केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.