Pimpri : युवक काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – मुंबई महापालिका अधिनियम 66 नूसार शहरातील झोपडपट्टीवासीयांना सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेची आहे, महिला व बालकल्याण समिती ने दि. 4 सप्टेंबर 2018 रोजी शहरातील झोपडपट्टीतील महिलांना व कुष्ठरोग्यांना साहित्य देण्याचा निर्णय घेतला.

यानुसार प्रत्येकी 2 चादर, 2 ब्लॅंकेट, 2 दरी पंजा व 2 बेडशीट असा मोफत संच वाटप करण्याबाबत ठरविण्यात आले. याचा लाभ सुमारे ५० हजार महिलांना होणार आहे. त्यास स्थायी समिती व सर्वसाधारण सभेनेही मजुंरी देऊनही प्रशासनाकडून या वाटपासाठी मोठा विलंब होतो आहे.

हि बाब अत्यंत अन्यायकारक व असंवेदनशील वर्तन दर्शविणारी आहे. यांबाबत महापालिका आयुक्तांनी त्वरित जलद गतीने कारवाई करून साहित्याचे वाटप गरजूना करावे, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

वंचित व पिडीत नागरीकांच्या आरोग्यास आवश्यक असणार्या साहित्याच्या वाटपावर वेळेत काम कराण्याऐवजी मोठ मोठ्या महत्वकांक्षी प्रकल्पांची स्वप्ने नागरिकांना दाखविणे अयोग्य व अशोभनीय तसेच महापालिकेच्या ‘कटिबध्दा जनहिताय’ या ब्रीद वाक्यास छेदणारे आहे असे बनसोडे म्हणाले.
यांवर त्वरित कारवाई व साहित्य वाटप न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी पत्राद्वारे दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.