Pimpri: प्लाझ्मादात्याला युवक काँग्रेस देणार एक हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी

क्रांतीदिन व युवक काँग्रेस स्थापना दिनानिमित्त अभिनव उपक्रम ; Youth Congress will give an incentive fund of one thousand rupees to the plasma donor

एमपीसी न्यूज – कोरोना आजारावर उपचारासाठी अंत्यत प्रभावी ठरत असलेल्या प्लाझ्मा उपचार पद्धतीद्वारे आपल्या रक्तातील प्लाझ्मा दान करण्या-या जीवनदात्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसकडून प्रत्येकी 1 हजार रूपये जीवनदाता प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे.

9 ऑगस्ट पासून म्हणजेच भारतीय युवक काँग्रेस स्थापना दिन व क्रांतीदिनाचे औचित्य साधत हा जीवनदाता प्रोत्साहन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

याबाबात अधिक माहिती देताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणले, “अभूतपूर्व अशा या भयानक व जीवघेण्या आजाराने आजवर जगाभरात लाखो बळी घेतले आहेत.

दिवसेंदिवस हा आजार हाहाःकार माजवत आहे. यावर गेल्या 8 महिन्यांपासून अजून तरी निश्चित औषध उपलब्ध झाले नाही. मात्र, सध्या प्लाझ्मा थेरपीने मोठ्या प्रमाणात उपचारांना यश मिळत आहे.

कोरोनामुळे होणारी जीवीतहानी टाळण्यास प्लाझ्मा थेरपी अंत्यत प्रभावी ठरत आहे. यासाठी कोरोनामधून ब-या झालेल्या रूग्णांनाच आपला प्लाझ्मादान करून इतर रूग्णांचे प्राण वाचविता येत आहेत.

अधिकाधिक रूग्णांचे प्राण वाचले जावेत. यासाठी ब-या झालेल्या रूग्णांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने प्रत्येक जीवनदात्यास एक हजार प्रोत्साहन निधी देणार आहे.

उपाचारानंतर बरे झालेल्या नागरिकांनी इतर नागरिकांसाठी पुढे यावे. प्लाझ्मादान करावा. प्रोत्साहन निधीसाठी 9860177177 आणि 8484083737 या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन बनसोडे यांनी केले आहे.

याबाबत युवक काँग्रेसने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना याबाबतचे पत्र दिले असून या उपक्रमाची माहिती कळविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.