Pimpri : रोहित्राचा शॉक लागून तरुण जखमी

एमपीसी न्यूज – विद्युत रोहित्राचा शॉक लागून एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी ( दि. 4 एप्रिल ) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास मोरवाडी दफनभूमी येथे घडली. श्याम छोटेलाल चौधरी  (वय 28) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
 गुरुवारी (( दि. 4 एप्रिल ) सायंकाळी अग्निशमन विभागाला समजले की, मोरवाडी (Pimpri) दफनभूमी येथे आग लागली आहे. त्यानुसार अग्निशामक दलाचे एक पथक घटनास्थळी  पाहणी करत असताना एक तरुण विद्युत रोहित्रापासून काही अंतरावर जखमी अवस्थेत विव्हळत पडलेला आढळून आला. तसेच  अग्वनिशामक दलाच्या जवानांना  रोहीत्राला आग लागल्याची  निदर्शनास आले.

Gold price : सोन्याच्या दरात भरमसाट वाढ, गुढी पाडव्याच्या आधीच भाव पोहोचला 72000 रुपये प्रति तोळा

 मोरवाडी (Pimpri) येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आग लागल्याची माहिती समजताच दफनभूमीतील विद्युत पुरवठा बंद केला. अग्निशामक दलाच्या पथकाने  त्वरित आग            आटोक्यात आणून जखमी तरुण  श्याम छोटेलाल चौधरी याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.