Pimpri : स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त रविवारी ‘युवा दिन महोत्सवा’चे आयोजन

एमपीसी न्यूज – स्वामी विवेकानंदच्या यांच्या 157 व्या जयंतीनिमित्त ‘युवा दिन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये युवा विवेक पुरस्कार प्रदान सोहळा आणि ‘योद्धा संन्यासी’ या प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. रविवारी (दि. 12) सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ला. ओमप्रकाश पेठे, ला. अभय शास्त्री, ला. हेमंत नाईक आदी उपस्थित राहणार आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांवर आधारित असलेल्या ‘योद्धा संन्यासी’चा एकपात्री प्रयोग होणार आहे. या प्रयोगाचे भारतभर 400 प्रयोगांचे यशस्वी नाट्यमंचन झाले आहे. दामोदर रामदासी हे या प्रयोगाचे सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांना युवा विवेक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्वत्र पसरविण्याचा उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी सर्वांना प्रवेश मोफत आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी आवर्जून यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

नृत्य कला मंदिरच्या संस्थापक अध्यक्षा आणि लायन्स क्लबच्या युवा विभाग प्रमुख ला. तेजश्री अडिगे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. तसेच ला. सविता निंबाळकर, ला. संदेश लाड, ला. प्रशांत गोमकाळे, ला. दीपा जाधव, ला. मोहन पाटील, ला. उमा पाटील यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.