Pimpri : भूमिपुत्रांना रोजगार देण्याचे निर्देश देण्याची पिंपरी युवा सेनेची मागणी

एमपीसी  न्यूज – पुणे परिसरातील उद्योगधंद्यांना  कामगार आयुक्तांनी सूचना देऊन 80 टक्के भूमिपुत्रांना रोजगार देण्याचे निर्देश द्यावेत. निवेदनाची दखल न घेतल्यास कामगार आयुक्त येथे पिंपरी युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन, अशी मागणी युवती सेना अधिकारी प्रतीक्षा घुले यांनी कामगार आयुक्तांकडे केली आहे.

निवेदन देताना, पिंपरी विधानसभा प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, उपविभाग संघटक सनी कड, ओंकार जगदाळे, रवि नगरकर, नंदकुमार देवकर आदी उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पुणे परिसरात असलेल्या खासगी उद्योग व कारखान्यांमध्ये जवळपास 80 टक्के नोकरभरती ही परप्रांतीय नागरिकांची होत आहे. महाराष्ट्रातील मराठी युवकांना रोजगार मिळत नसून नोकरीच्या शोधामध्ये भटकावे लागत आहे. पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कारखाने व उद्योग हे महाराष्ट्रामध्ये येऊन व महाराष्ट्राच्या साधन संपत्तीचा वापर करुन नफा कमवितात. व येथील पर्यावरणाचे नुकसान करतात. व नफा आपल्याला राज्यामध्ये घेऊन जातात. तर आपले युवक आपल्या वृद्ध आई वडिलांना आधार देण्याचे स्वप्न देखील पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.