Pimpri News : फेरीवाल्यांचे पुर्नवसन (हाॅकर्स झोन) करा; पिंपरी युवासेनेची मागणी

एमपीसी न्यूज – महापालिकेकडून सर्व फेरीवाले, भाजीविक्रेते व पथारीधारक यांचा नव्याने सर्वेक्षण करून त्यांना हाॅकर्स झोनची आखणी करून द्यावी. त्यानंतरच नियमबाह्य व्यवसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी पिंपरी युवासेनेने महापालिकेकडे केली.

पिंपरी युवासेनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग अधिकारी सतिश इंगळे यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, कोरोना काळानंतर एकीकडे व्यवसाय व उद्योगधंदे पूर्वपदावर येत असताना महापालिकेकडून पथारीधारक,भाजीविक्रेते व हातगाडी फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

महापालिकेकडून सर्व फेरीवाले, भाजीविक्रेते व पथारीधारक यांचा नव्याने सर्वेक्षण करून त्यांना हाॅकर्स झोनची आखणी करून द्यावी. त्याबाबतचे धोरण तयार असूनदेखील अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसून भाजीविक्रेते, पथारीधारक व हातगाडीवर व्यापारीवर्गावर कारवाई करण्यापूर्वी त्यांची नोंदणी करून पुनर्वसन करण्यात यावे.

पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके, सामाजिक कार्यकर्त्यां शीलामामी जाधव, सुनील झिटे, अनिकेत घुले, जीवन चलवारे, संकेत जावळकर, लश्मी भंडारे, मोजेस अंतोनी, रंजना कांबळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.