Pimpri: डेअरी फार्म रेल्वे फाटक दुरूस्तीच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – पिंपरीतील डेअरी फार्म रेल्वे फाटकाच्या दुरूस्तीच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबत  वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी आज (शनिवारी) आदेश काढला.

पिंपरीतील डेअरी फार्म रेल्वे फाटक येथे खडी, स्लिपरस, रेल्वे रूळ आदी दुरूस्तीचे कामे  25 ते 27 एप्रिल या कालावधीत करण्यात येणार आहेत.

त्यासाठी वाहन चालकांनी  पिंपरी डेअरी फार्म रोडने रेल्वे गेट फाटकाकडे न जाता सरळ पुणे-मुंबई रोडने आंबेडकर चौकातून पिंपरी मार्गे इच्छित स्थळी जावे. तसेच नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी रोडने डेअरी फार्मकडे जाणारी वाहतूक नवमहाराष्ट्र विद्यालय येथून डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.