Pimpri : ‘बेबी डॅाल’फेम गायिका कनिका कपूरला ‘कोरोना’ची लागण

एमपीसी न्यूज – बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवरून तीने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर केले आहे. कनिका काही दिवसांपूर्वी लंडनवरून भारतात परतली होती. लखनऊमध्ये कनिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे.

‘बेबी डॉल मैं सोने दी’ व ‘चिट्टीया कलाईया’ या प्रसिद्ध गाण्याची गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, काही दिवसांपूर्वी ती लंडनवरून परतली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर ती एका हॉटेलमध्ये थांबली होती तसेच एका डिनर पार्टीतसुद्धा ती सहभागी झाली होती.

या पार्टीत जवळपास 100 लोकांच्या संपर्कांत आली असल्याचं सांगितले जात आहे. या पार्टीसाठी उपस्थित असणाऱ्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे तसेच खासदार दुष्यंत सिंग उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी दुष्यंत सिंग यांची संसद भवनात उपस्थिती होती. त्यामुळे कोरोना आता संसदेच्या उंबरठ्यावर पोहचला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.