Pimpri: नगरसेवक जावेद शेख यांची दुसरी कोरोना टेस्ट गुरुवारी  निगेटीव्ह आली होती 

Corporator Javed Sheikh's second corona test was negative on Thursday :प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांचे आज (शुक्रवारी) कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांची काल, गुरुवारी  दुसरी कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट  निगेटिव्ह आले होते, असे पालिकेच्या वैद्यकीय विभागाने सांगितले आहे.

नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोना रिपोर्ट 15 जुलै रोजी  पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना आकुर्डीमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, काल (गुरुवारी)  त्यांची पुन्हा कोरोनाची  (कोविड-19) दुसरी चाचणी करण्यात आली असता ती निगेटिव्ह आली होती. रुबी हॉल येथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज त्यांचे निधन झाल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.

दरम्यान, नगरसेवक जावेद शेख यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाल्याची भावना महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1