Pimpri : जमावबंदीचे आदेश झुगारून आंदोलन केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

Crime against Vishwa Hindu Parishad and Bajrang Dal activists for carrying out agitation in defiance of curfew

एमपीसी न्यूज – जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश झुगारून आंदोलन केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कुणाल साठे, नितीन वाटकर, आहेरराव आणि त्यांच्या चार ते पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई जी. एम. खाडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

या कालावधीत कोणतेही राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद पुकारणे, उपोषण यांसारखी आंदोलने करू शकत नाहीत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल अशी वक्तव्य, घोषणाबाजी, प्रदर्शन, प्रतीकात्मक दहन करणे तसेच घोषणा देणे व वाद्य वाजविण्यावर बंदी आहे.

असे असताना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी येथील साई चौक ते शगुन चौक या दरम्यानच्या रस्त्यावर आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 188, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.