Pimprigaon News : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास ग्रामस्थांच्या वतीने जलाभिषेक

एमपीसीन्यूज : पिंपरी प्रभाग क्र. 21 मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सरसेनापती येसाजीराव कंक यांचे वंशज सिद्धार्थ संजय कंक यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला सन्मानपूर्वक जलाभिषेक करण्यात आला. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

याबाबत अधिक माहिती देताना नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नूतनीकरणाचे काम महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे.

या ठिकाणी असलेला पूर्वीचा पुतळा बदलून नवीन सिंहासनारूढ पुतळा (रायगड प्रतिकृती) बसविण्यात येणार आहे.

तत्पूर्वी शिवस्मारक समिती, अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव व पिंपरी ग्रामस्थ यांच्या वतीने सरसेनापती येसाजीराव कंक यांचे 14 वे वंशज श्री. सिद्धार्थ संजय कंक यांच्या हस्ते व रायगड येथील राजपुरोहित प्रकाश स्वामी यांचे उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्याला सन्मानपूर्वक जलाभिषेक करण्यात आला.

यावेळी महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे, नगरसेवक डब्बु आसवणी, वस्ताद दत्तोबा नाणेकर, किसनराव कापसे, संतसेवक बाळासाहेब वाघेरे, कुणाल साठे,चंद्रकांत गव्हाणे आदींसह शिवप्रेमी नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.