Pimpri: महापालिकेची सर्वसाधारण सभा गणसंख्येअभावी तहकूब

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या भितीने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांनी महासभेकडे पाठ फिरविली. त्यामुळे गणसंख्येअभावी महापालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा आज (बुधवारी) तहकूब करावी लागली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेची मार्च, एप्रिल अशी सलग दोन महिने सर्वसाधारण सभा झाली नव्हती. त्यामुळे सत्ताधारी भाजपने मे महिन्याची सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन केले होते.

त्यानुसार आज (बुधवारी) सभेचे आयोजन केले होते. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

शहरात कोरोनाच्या कहर पाहता अनेक नगरसेवकांनी महासभेकडे पाठ फिरविणे पसंत केले. महासभा सुरु करण्यासाठी 45 नगरसेवकांची उपस्थिती आवश्यक असते. दुपारी दोन वाजता सभा कामकाजाला सुरुवात झाली.

त्यावेळी केवळ 40 ते 41 नगरसेवक सभागृहात हजर होते. त्यामुळे महापौर ढोरे यांनी गणसंख्येअभावी महासभा तहकूब केल्याचे जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.