Pimpri: ‘माथाडी मंडळाकडील जमा शिलकीतून कामगारांना दहा हजार रुपयांची मदत करा’

कामगार नेते इरफान सय्यद यांची राज्य सरकारकडे मागणी

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे माथाडी, मापाडी, हमाल कामगार घरी बसून आहेत.  या कामगारांचे  हातवरचे पोट आहे. लॉकडाऊनमुळे हजारो माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्र माथाडी, मापाडी, हमाल श्रमजिवी व असंरक्षीत कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत येणा-या नोंदीत कामगारांना माथाडी मंडळाकडे जमा असणा-या शिल्लक करोडो रूपयांच्या निधीतून दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. त्याबाबतचे आदेश माथाडी मंडळांना द्यावते, अशी मागणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष, खेड-आळंदी, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख, कामगार नेते इरफान सय्यद यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत सय्यद यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी निवेदन पाठविण्यात आले आहे. कोरोना व्हायरस या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. आपल्या देशात ही कोरोना व्हायरस या आजाराशी लढा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने काही महत्वाचे आदेश जारी केले आहेत.

मुख्यत्वे म्हणजे कोरोना व्हायरस या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोना आजाराचा संसर्ग व फैलाव रोखण्यासाठी घेण्यात आलेला हा निर्णय व आदेश कौतुकास्पद व देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सर्व देशभरातील नागरीक या आदेशाचे पालन करणे हे आपले प्रथम कर्तव्य समजून घरात राहत आहे.

महाराष्ट्रातील माथाडी कामगार सुद्धा सरकारी आदेशांचे पालन करीत आहे. कोरोना व्हायरस आजाराची परिस्थिती पाहता हा जाहीर केलेला लॉकडाऊनच्या कालखंडात अनिश्‍चित काळासाठी वाढ होऊ शकते. महाराष्ट्रात माथाडी ,मापाडी व अंगमेहनतीचे काम करणारे अनेक कामगार आहेत. ज्यांचे  हातावरचे पोट आहे. माथाडी व श्रमजिवी कामगार कायदा पण “कोम तेवढेच दाम ” असे सांगतो. कष्ट करून रोजचे रोज हातावर पोट असणा-या या माथाडी कामगारांवर आज उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आदेशाचे पालन करत त्यांना घरातच राहावे लागत आहे. अंगमेहनतीचे काम करणा-या या कामगांराना जर काम केले. तरच पैसे मिळत असतात.  कामावर अवलंबून असणारे हे कामगार आपला उदरनिर्वाह  लॉकडाऊनच्या काळात कसा करणार? महाराष्ट्र सरकारने कंपनीमध्ये काम करणा-या कामगारांना लॉकडाऊनच्या काळात किमान वेतन देण्याचे आदेश सर्व कंपनी मालक यांना दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड, पुणे माथाडी मंडळाच्या अंतर्गत भोसरी , चाकण तळेगाव , रांजनगाव  यासारख्या औद्योगिक वसाहती येतात. या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यात सुमारे 25 हजार माथाडी कामगार काम करत आहेत. कंपनी बंद असल्याने हा माथाडी ‘ कामगार घरी आहे.  लॉकडाऊनच्या काळात आपला उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेत हा कामगार आहे.  महाराष्ट्र मजदूर संघटना ही पुणे जिल्ह्यात नोंदीत माथाडी कामगारांचे प्रश्‍न उपस्थित करून ते सोडवण्यासाठी कार्यरत असलेली संघटना आहे.

कंपनीत काम करणा-या कामगाराला किमान वेतन देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र माथाडी, मापाडी, श्रमजिवी व  असरंक्षीत कामगार कल्याणकारी मंडळात जमा असणा-या शेकडो करोड रुपयांच्या शिल्लक निधीच्या रक्‍कमेतून दहा हजार रुपये कामगारांना द्यावेत. त्यांच्या उदरनिर्वाहसाठी कामकागारांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश संबंधित माथाडी मंडळाना  द्यावेत, अशी विनंती सय्यद यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.