Pimpri: शहरात आज 563 नवीन रुग्णांची नोंद, 721 जणांना डिस्चार्ज, 20 मृत्यू

In city today, 563 new patients were registered, 721 were discharged and 20 died : शहरात आजपर्यंत 12 हजार 221 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 7811 जण बरे होऊन घरी गेले.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शहराच्या विविध भागातील 540 आणि शहराबाहेरील 23 अशा 563 जणांना आज (मंगळवारी) कोरोनाची लागण झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 721 जणांना आज घरी सोडण्यात आले. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या 12 हजार 221 वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे आज 20 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंतचा हा सर्वांधिक मृत्यूचा आकडा आहे.

चिंचवड येथील 42, 65 वर्षीय असे दोन पुरुष, नेहरुनगरमधील 65 वर्षीय महिला, भोसरीतील 38 वर्षाचा युवक, 56 वर्षीय पुरुष, संत तुकारामनगर मधील 66 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील 63 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 51 आणि 57 वर्षीय पुरुष, सांगवीतील 84 वर्षीय वृद्ध, 52 वर्षीय पुरुष, दिघीतील 75 वर्षीय वृद्ध महिला, वल्लभनगरमधील 80 वर्षीय वृद्ध, काळेवाडीतील 73 वर्षीय वृद्ध, दापोडीतील 72 वर्षीय वृद्ध महिला, निगडी, यमुनानगर येथील 42 वर्षीय पुरुष, ताथवडेतील 58 वर्षीय महिला, कोथरुड येथील 89 वर्षाची वृद्ध महिला, जांभेतील 36 वर्षाचा युवक आणि जुन्नर येथील 54 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 12 हजार 221 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 7811 जण बरे होऊन घरी गेले. शहरातील 226 जणांचा, तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 60 अशा 286 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या 3107 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 2761

# पॉझिटीव्ह रुग्ण – 563

#निगेटीव्ह रुग्ण – 1508

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 1698

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3107

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 2746

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 12,221

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 3107

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -286

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 7811

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 26949

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 90786

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.