Pimpri : कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षेत विश्वास स्पोर्ट्स क्लब च्या विद्यार्थ्यांचे यश

एमपीसी न्यूज – महिंद्रा अँथेईआ पिंपरी या ठिकाणी युनिव्हर्सल (Pimpri) शोतोकान कराटे दो असोसिएशनच्या वतीने कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षेचे शनिवारी (दि.6) आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत विश्वास स्पोर्ट्स क्लब” चे ब्लॅक बेल्ट परीक्षेत मुले व मुली असे एकूण 6 विध्यार्थ्यानी सहभाग घेतला.

ब्लॅक बेल्ट परीक्षेचे युनिव्हर्सलशोतोकान कराटे दो असोसिएशनचे अंकुश तिकोने  यांनी आयोजन केले होते. ब्लॅक बेल्ट परीक्षा देण्यासाठी कमीत कमी 4 वर्षाचा कालावधी लागतॊ, या परिक्षेसाठी तयारी ही खूप अगोदरच सुरुवात करावी लागते, ब्लॅक बेल्ट च्या परीक्षेत सहभाग घेण्यासाठी अगोदरच्या 8 परीक्षेचे टप्पे पार करावे लागतात त्यानंतरच ब्लॅक बेल्ट परीक्षा आयोजित करण्यात येते.

Pune : पुण्यातून 14 लाखांचे एमडी जप्त, 61 वर्षीय इसमाला अटक

तसेच प्रत्येक टप्प्यात विद्यार्थ्यास स्वतःची क्षमता,गुणवत्ता आणि योग्यता चे प्रमाण द्यावे लागतात.विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसाचे शिबिर आयोजित करून प्रशिक्षण देण्यात आले.शिबिर मध्ये कुमिते व काता तसेच आत्मसंरक्षण, शरीर मजबूत करने आणि काताचे नवीन प्रकार याचे प्रशिक्षण देण्यात आलेआणि सहाव्या दिवशी परीक्षा घेण्यात आले.

खालील प्रमाणे विश्वास स्पोर्ट्स क्लबच्या विध्यर्थ्यांनी आपले यश नोंदविले आहे.

अत्रेयी सील A+ ग्रेड सहित प्रथम क्रमांक, गायत्री जोशी A ग्रेड सहित द्वितीय क्रमांक आणि हमसिनी कंचर्ला B+ ग्रेड सहित, तृतीय  क्रमांक नोंदविले तसेच राघव केंजळे B ग्रेड ,प्रणव जगताप B ग्रेड आणि यथार्थ शर्मा B ग्रेड प्राप्त करून आपले यश नोंदविले आहे.

या विध्यार्थाना NIS प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक तसेच विश्वास स्पोर्ट्स क्लब चे संस्थापक विश्वास मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच प्रशिक्षक सूर्यकांत वाघमारे व नवनाथ नवघणे यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन (Pimpri) लाभले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.