Pimpri : स्थानिक प्रशासनाला सॅनिटायजर मोफत उपलब्ध करून द्या – उत्तम केंदळे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये कोरोनामुळे भयावह परिस्थिती आहे. या विषाणूवर मात करण्यासाठी सरकारने सॅनिटायझर, मास्क यासारख्या गोष्टी कमी दरात किंवा मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात केंदळे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी लागणारी प्रतिबंधक साधन सामग्री स्थानिक प्रशासन जसे जिल्हा रुग्णालये, महापालिका दवाखाने या ठिकाणी उपलब्ध नाहीत.  त्यामुळे सर्वसामान्य व गरीब नागरिकांना परडवेल या दरात सॅनिटायझर व मास्क किमान पंधरा दिवसासाठी कमी दरात किंवा मोफत उपलब्ध करून देण्यात यावेत.

याबाबत लवकरात लवकर जीआर काढून अंमलबजावणी करावी. त्यामुळे प्रशासन या कोरोना व्हायरस आपत्तीवर नक्कीच मात करेल,  असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.