Pimpri: ‘आनंद ज्येष्ठ नागरिक संघा’च्या वतीने पोलिसांना ‘अर्सेनिक अल्बम 30’ गोळ्यांचे वाटप

pimpri's anand senior citizen union distributed arsenic album 30 tablets to chinchwad police station

एमपीसी न्यूज- समाजासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या चिंचवड पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना ‘आनंद ज्येष्ठ नागरिक संघा’च्या वतीने ‘अर्सेनिक अल्बम 30’ या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

‘अर्सेनिक अल्बम 30’ या होमिओपॅथिक गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावशाली असून ‘कोरोना’ सारख्या विषाणुजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर याचे सेवन करणे फायदेशीर ठरणार आहे.

तसेच, आयुष मंत्रालयातर्फे सुद्धा या गोळ्यांची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या महामारीत जिवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिवाचे रक्षण व्हावे या हेतूने चिंचवड येथील ‘आनंद ज्येष्ठ नागरिक संघा’ने आज (दि. 27) चिंचवड पोलीस ठाण्यात जाऊन ‘अर्सेनिक अल्बम 30’ या होमिओपॅथिक गोळ्यांची 200 पाकिटे सुपुर्द करण्यात आली.

चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांनी एलआयडी प्रमुख दत्तात्रय कांबळे यांच्या समवेत ही औषधी पाकिटे स्वीकारली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजा गोलांडे, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, सचिव रवींद्र कुलकर्णी, नृसिंह पाडुळकर, रवींद्र झेंडे यांची उपस्थिती होती. या औषधांचा खर्च आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य अशोक नागणे आणि अनिल करंदीकर यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.