Pimpri : पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाकडूनही कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या यंत्रणेचे आभार

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूशी मुकाबला करणाऱ्या सर्व यंत्रणेचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनोखी युक्ती नागरिकांना दिली. त्यानुसार रविवारी (दि. 22) दुपारी ठीक पाच वाजता सर्व नागरिकांनी आपापल्या घरी टाळ्या आणि शंखनाद करून आभार व्यक्त केले. यामध्ये अग्निशमन विभागाच्या  कर्मचाऱ्यांनी वाहनांचे सायरन, टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानले.

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी डॉक्टर, नर्स, वैद्यकीय विभागातील संपूर्ण कर्मचारी वर्ग, त्याचबरोबर प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या सर्व यंत्रणेचे नागरिकांनी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून काही नागरिकांनी टाळ्या वाजवल्या, तर काही नागरिकांनी थाळ्या वाजवून तसेच शंखनाद करून आभार व्यक्त केले. रविवारी दुपारी पाच वाजता सर्व नागरिकांनी आपापल्या  घरासमोर येऊन तसेच सोसायट्यांमध्ये राहणा-या नागरिकांनी बाल्कनीमध्ये येऊन आभार मानले.

याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे मध्यवर्ती केंद्र येथे अधिकारी आणि जवानांनी  बंब रस्त्यावर थांबवून सायरन वाजविले. तसेच व सर्व उपविभागीय केंद्र येथे कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून संपूर्ण प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.