Pimpri News : दुकानातून कामगारानेच चोरला सात हजाराचा पाईप

एमपीसी न्यूज – दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानातून सात हजाराचा पाईप चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 26) सायंकाळी नेहरूनगर,(Pimpri News) पिंपरी मधील मरीना इंजिनिअरिंग कार्पोरेशन नावाच्या दुकानात घडली.

सिज्जो थॉमस ऍंथोनी (वय 37, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज कुमार राऊत (वय 29, रा. काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune crime : चार किलो गांजासह एकाला बावधन येथून अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नेहरूनगर येथे मरीना इंजिनिअरिंग कार्पोरेशन नावाचे हायड्रॉलिक पाईप विक्रीचे दुकान आहे. त्या दुकानात आरोपी मनोज हा काम करतो.(Pimpri News) त्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय दुकानातून सात हजारांचा एक हायड्रॉलिक पाईप चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.