Pisces – Annual Horoscope 2020-2021: मीन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती व प्रतिष्ठा वाढवणारे वर्ष

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात मीन राशीचे वार्षिक राशी भविष्य 2020-2021. मीन राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार गेली 12 वर्षे आम्ही एमपीसी न्यूजसाठी वार्षिक राशी भविष्य लिहित आहोत. ज्योतिषशास्त्राच्या विविध अंगांचा विचार करून आम्ही वार्षिक राशी भविष्याचे लेखन केले आहे. प्रत्येक ग्रहाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो व प्रत्येक ग्रहाची गती कमी-जास्त असल्यामुळे आपण जास्त काळ एका राशीत राहणार्‍या ग्रहाचा परिणाम कसा होईल, त्यांचे विवेचन राशी व नक्षत्रानुसार केले आहे.

ग्रहांची मानसिकता शास्त्र व राशीप्रमाणे बदलते. काही ग्रह जगणे नकोसे करणारे वाटतात, परंतु तेथे ग्रह थोड्या कालावधीनंतर आनंद देणारे ठरतात. सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन हे कुटुंब, मित्र परिवार व नोकरी व्यवसाय यांनी व्यापलेले असते. यात काही शुभ घटना घडल्या की मनुष्य आनंदी होतो. परंतु अप्रिय घटना घडल्यास मनुष्य दु:खी होतो.

आम्ही वार्षिक़ राशी भविष्य लिहिताना प्रमुख अंगांचा जास्त विचार करून लिखाण केले आहे. तसेच उपासना ही या वर्षीच्या ग्रह गोचरीनुसार प्रत्येक राशीस सुचवली आहे. तसेच प्रत्येक राशीला शुभ रंग, भाग्य रत्न, शुभदिनांक व शुभकारक वयवर्षे आम्ही सुचविलेली आहेत. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेतल्यास आपले कार्य सिद्धीस जाईल, असे वाटते.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्यचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

मीन  : प्रगती व प्रतिष्ठा वाढवणारे वर्ष

मीन राशी चक्रातील ही शेवटची रास असून जल तत्वाची द्विस्वभावी स्त्री राशी असून या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीचे चिन्ह विरूद्ध दिशेला तोंड असणारे दोन माासे आहेत. भावना प्रधान, मनाच्या हळव्या, यशाची उलटी सुलटी प्राप्ती होणारी अनाथ लोकांची मदत, गोरगरीबाची जाणीव असणारी या राशीच्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर सात्विकतेचे तेज असते. प्रसन्नपणा असतो. शांतपणा चेहर्‍यावर असतो. भव्यतेची झाक असते. दयाळू, मायाळू व ममता आहेत.

भांडण तंटा न करता सर्वांशी जूळवून घेऊन गोडी गुलाबीने राहण्याचा आपला स्वभाव असतो. आपण येणार्‍या प्रश्‍नाचा विचार भावनेने करता, नाजूकपणा, कोमलपणा, आपणाकडे अधिक आहे. आपल्या राशीत असणार्‍या व्यक्तीमध्ये नम्रता आहे. दया, क्षमा, शांती यांची प्राप्ती आपल्या स्वभावात असते.

मीन राशीचे व्यक्ती जास्त करून संत, आचार्य, तपस्वी, ऋृषीमुनी यांच्या शोधात असतात. मीन राशीत पूर्वाभाद्रपद, उत्तर भाद्रपदा व रेवती ही नक्षत्रे येतात. मीन रास पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचे व्यक्ती हुशार, धनी, धार्मिक मधुर भाषा बोलणारी, सौम्य व सात्विक व्यवहार असणारी असते.

मीन रास उत्तरा भाद्रपदा नक्षत्र असणारी व्यक्ती न्यायप्रिय मेहनती, त्यागी, महत्वाकांक्षी,ध्यान व योगात या गोष्टीत आवड असणारी श्रद्धाळू, तर्कशुद्ध बोलणारे योग्यता संपन्न, परोपकारी व श्रद्धावान असतात. तर मीन रास रेवती नक्षत्रामधील व्यक्ती उत्तम स्मरणशक्ती, उंचीने कमी, हुशार, नि:स्वार्थी कायदे पंडीत असतात.

यांना मित्र पुष्कळ असतात ही माणसे लोकप्रिय असतात. ईश्‍वरावर श्रद्धा ठेवून सत्कर्मी काम करतात.

अशा धर्मावर श्रद्धा व विश्‍वास असणार्‍या मीन राशीच्या व्यक्तीचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू…

मीन राशीच्या लाभ व व्यय स्थानातून गुरुचे भ्रमण होणार असून हे वर्ष आपणास लाभदायक राहील. मोठी इच्छा पूर्ण होईल. मोठे लाभ होतील. उत्पन्नात वाढ होईल व उंची वस्तू/अलंकार यांची प्राप्ती होईल. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात यश मिळेल. नवदाम्पत्यांना संतती प्राप्ती होईल.

तरुणांना विवाह काळ उत्तम आहे. शेअर्समध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक ठि राहील. नवीन मित्र भेटतील, मित्रची मदत होईल. यावर्षी मूलाची चांगली प्रगती होईल. भागीदारीच्या कामात यश मिळेल. भावंडाचे सौख्य मिळेल. कला/खेळ/साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना यश व प्रसिद्धी मिळेल.

एप्रिल 2021 नंतर गुरुचे भ्रमण व्ययस्थानातून होणार असून हितशत्रूचे प्राभल्य वाढून मानसिक त्रास होईल. सूचक स्वप्ने पडतील, द्यिार्थी वर्गाला स्पर्धा व कला क्षेत्रामध्ये जास्त कष्ट घ्यावे लागतील. मात्र यावर्षी आपला नाव लौकीक वाढेल हे निश्‍चीत.  कौटुंबिक व आर्थिक सौख्यासाठी हे वर्ष अनुकूल राहील.

राशीच्या लाभातूनच शनिचे भ्रमण होत असून कोर्टकचेरीच्या कामाध्ये मनासारखे निर्णय होतील. निवडणुकीमध्ये विजय मिळेल. दीर्घ काळाची इच्छा पूर्ण होईल. मोठे कर्ज सहज मिळेल. शेअर्समध्ये गुंतवणूक लाभदायक राहिल. अधून मधून पायाचे दुखणे, सांधेदुखणे यामुळे त्रास दर्शवितो.

प्रवास जपून करावा. विमा, पेन्शन या कामात दिरंगाई होईल. तर राहू केतूचे भ्रमण तृतीय व भाग्यस्थानातून होत असून मानसिकता चांगली राहील. मोठे धाडसी निर्णय घ्याल.
नोकरीमधील अस्थैर्य कमी होईल. शत्रुवर विजय मिळेल. मोठे प्रवास होतील. मात्र भावंडे व नातेवाईक यांच्याशी मतभेद टाळावे. मोठ्या संधी मिळतील पण दिरंगाई नंतरच मोठ्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अडचणी वाढण्याची शक्यता राहील.

उपासनेमध्ये खंड पडेल. एकूण मीन राशीला या वर्षाचा  पूर्वार्ध लाभदायक व प्रगतीचा प्रतिष्ठा वाढविणारा राहील. उद्योग व्यवसायामध्ये उत्तम यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील, कोर्टकचेरीत व निवडणुकीत विजय प्राप्ती राहील.

उपासना : आपण लक्ष्मी नारायण व गणपती उपासना केल्यास लाभदायक राहील. तसेच दर शनिवारी, मंगळवारी गणपती मंदिरामध्ये लाल पदार्थ, कापड दान केल्यास (सफरचंद, गूळ) अन्नदान केल्यास उत्तम राहील.

शुभरंग : गुलाबी, निळसर, पोपटी.

शुभरत्न : प्रवाळ व पुष्कराज रत्नाचा वापर केल्यास उत्तम.

शुभदिनांक : कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30.

भाग्यकारक वयोवर्ष : 9, 18, 26, 36, 44, 45.

Aries – Annual Horoscope 2020-2021: मेष राशीसाठी यशकारक वर्ष

Taurus – Annual Horoscope 2020-2021: वृषभ राशीच्या व्यक्तींची यशाकडे वाटचाल

Gemini – Annual Horoscope 2020-2021: मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत मोठे बदल

Cancer – Annual Horoscope 2020-2021: कर्क राशीच्या व्यक्तींच्या व्यावसायिक प्रगतीचे वर्ष

Leo – Annual Horoscope 2020-2021: सिंह राशीच्या व्यक्तींना शत्रूवर विजय, प्रवासाचा लाभ

Virgo – Annual Horoscope 2020-2021: कन्या राशीच्या व्यक्तींना पदवी- पुरस्कारांचा योग

Libra – Annual Horoscope 2020-2021: तूळ राशीच्या व्यक्तींची जागेची कामे होतील यशस्वी

Scorpio – Annual Horoscope 2020-2021: वृश्‍चिक राशीच्या व्यक्तींना राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेच्या पदांचा योग

Sagittarius – Annual Horoscope 2020-2021: धनु राशीच्या व्यक्तींना उत्तम धनसंचय व प्रसिद्धीची संधी

Capricorn – Annual Horoscope 2020-2021: मकर राशीच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये सकारात्मक बदल

Aquarius- Annual Horoscope 2020-2021: कुंभ राशीच्या व्यक्तींना यश निश्‍चित, पण संघर्षातूनच!

Pisces – Annual Horoscope 2020-2021: मीन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती व प्रतिष्ठा वाढवणारे वर्ष

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.