Kalewadi : पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त; एकजण अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

गणेश मारूती माळी (वय 26, रा. महादेव मंदीराजवळ, जुनी सांगवी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी (दि.6) सायंकाळी साडेचारच्या सुमारास काळेवाडी येथील एका बेकरीसमोरील रस्त्यावर माळी हा पिस्तुलासह उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 27 हजार 500  रूपये किंमतीचे एक गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे व पिस्तूल सारखे दिसणारे एक लायटर सापडले. पोलिसांनी माळी याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.