Alandi : आळंदी रोड परिसरातून पिस्टल, गावठी कट्टा जप्त; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi) रोड भोसरी येथून भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्टल, एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे असे शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 28) दुपारी तीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.

Pune : काव्य, नृत्य, एकपात्री प्रयोग यांमधून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकर

दिलीप प्रेमनारायण तिवारी (वय 42, रा. कोल्हापूर. मूळ रा. उत्तर प्रदेश), चंदन कुमार उर्फ बैजूराय चंदेशवर राय (वय 19, रा. कोल्हापूर. मूळ रा. बिहार), सुगनकुमार जवाहिर राय (वय 18, रा. कोल्हापूर. मूळ रा. बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार आशिष गोपी यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी रोड (Alandi) येथील 52 खोल्या समोरील मोकळ्या मैदानात तिघेजण संशयरीत्या थांबले असून त्यांच्याकडे शस्त्र असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्

यानुसार पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 50 हजार रुपये किमतीचे एक पिस्टल, दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आणि 30 हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा असा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.