Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले “आम्ही सारे सावरकर”चे फलक

एमपीसी न्यूज – संपूर्ण भारतामध्ये व महाराष्ट्रात वीर सावरकर या विषयावर चर्चा व वादळ उठले असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा “मी सावरकर” या आशयाचे बॅनर विविध ठिकाणी झळकले आहेत.(Pimpri News) त्याची चर्चा सध्या शहरात चालू आहे. भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी हे फलक शहरात लावले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ आणि सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पक्षाच्या वतीने “आम्ही सारे सावरकर” ही‌ मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Pune : पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे – पालकमंत्री

त्यानंतर भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा “मी सावरकर” या आशयाचे बॅनर विविध ठिकाणी लावले आहेत. शहरात  झळकणाऱ्या या फलकांची चर्चा होत आहे.

या संदर्भात अमित गोरखे म्हणाले की, “देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्याची होळी करणारे महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी सातत्याने अपमानास्पद वक्तव्य केली जात आहेत. तसे करून करोडो देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.(Pimpri News) त्यामुळे ‌”आम्ही सारे सावरकर” हे अभियान सुरू करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. आमच्या या स्वातंत्र्यवीरांचा जाणीवपूर्वक होणारा अवमान यापुढे सहन केला जाणार नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.