MLA Anna Bansode : भटक्या प्राण्यांबाबत उपाय योजना करा; आमदार अण्णा बनसोडे यांची प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी भाजी मंडई गाळेधारकांचे प्रलंबित प्रश्न, प्राधिकरण एलआयसी कॉलनीतील नागरिकांच्या अडचणी व भटक्या प्राण्यांबाबत उपाय योजना कराव्यात, अशा सूचना पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रशासनाला (MLA Anna Bansode) दिल्या.

पिंपरी मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आमदार बनसोडे (MLA Anna Bansode) यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली. माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर राजू मिसाळ, शैलेजा मोरे, डब्बु आसवाणी, माजी नगरसेवक अमित गावडे, प्रसाद शेट्टी तसेच अनुप मोरे, सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सतीश लांडगे, प्रतीक इंगळे व प्राधिकरण परिसर व मतदार संघातील नागरिक उपस्थित होते.

Break The Silence : आत्महत्या आणि बलात्कारास प्रतिबंध करण्यासाठी पुण्यात ‘ब्रेक द सायलेन्स’ संघटनेची स्थापना

आकुर्डी प्राधिकरणातील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करण्याबाबत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्या दौऱ्यावर असल्याने आयुक्त शेखर सिंह यांना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी उपस्थित राहायचे असल्याने वेळअभावी बैठक रद्द करून चर्चा केली. पुढील आठवड्यामध्ये विभागवार आढावा बैठकी घेण्यासाठी वेळ देण्यात येईल असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले असल्याचे आमदार बनसोडे यांच्याकडून माध्यमांना कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.