Moshi : जागतिक पर्यावरण दिन तसेच वटपौर्णिमेनिमित्त संतनगर मोशी- प्राधिकरणमध्ये वृक्षारोपण

Plantation at Santnagar Moshi-Pradhikaran on the occasion of World Environment Day and Vatpoornime

एमपीसी न्यूज – जागतिक पर्यावरण दिन तसेच वटपौर्णिमेनिमित्त भूगोल फाउंडेशन व संतनगर मित्र मंडळ यांच्यातर्फे आज (शुक्रवारी) वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे तसेच लाॅकडाऊनचे सर्व नियम पाळत वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी संतनगर मोशी- प्राधिकरणमध्ये मुख्य रस्त्याच्या कडेला वड, पिंपळ, कडूनिंब, बकुळ, अर्जुन, करंज असे विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आले.

भूगोल फाउंडेशन अध्यक्ष विठ्ठल नाना वाळुंज यांनी सर्वच कार्यकर्त्यांना ज्याठिकाणी शक्य होईल त्याठिकाणी वृक्षारोपण करण्याचे व जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करून पर्यावरणाच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी कर्नल तानाजी अरबुज, साहेबराव गावडे, शशिकांत वाडते, चंद्रकांत थोरात, राजेश किबिले व भूगोल फाउंडेशनच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोसायटी जवळ वटवृक्षाची विधिवत पूजा करून वटवृक्षाचे रोपण केले.

या वृक्षरोपण प्रसंगी शोभा फटांगडे, शिला इचके, रोहिणी हांडे, संगीता मिसाळ, वैशाली मोरे, प्रणीती मोरे, सुनंदा चै्ाधरी, पूजा मिसाळ या महिला सहभागी झाल्या होत्या.

भूगोल फाउंडेशनचे विठ्ठल वाळुंज यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, सर्वच नागरिकांनी येणाऱ्या पावसाळ्यात शक्य होईल तेवढ्या जास्त प्रमाणात झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी घ्यावी.

निसर्गाशी नाते दृढ करत एक झाड लावून पर्यावरणाच्या कामाला सुरूवात करण्याची विनंती त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.