Chikhali: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण, संवर्धन करणे काळाची गरज – एकनाथ पवार 

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे व पर्यावरणाचा समतोल राखणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे मत महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले. 

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक 11 मधील सीडीसी – 1, 2 आणि 3 या मोकळ्या मैदानाच्या आवारात 2100 झाडांची रोपे लावण्यात आली. यावेळी क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती संजय नेवाळे, नगरसेविका योगिता नागरगोजे, अश्विनी बोबडे, सामाजिक कार्यकर्ते  सचिन काळभोर, गोरख पाटील, नागेश शेट्टी, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कांबळे, उपअभियंता विजय कांबळे, कनिष्ठ अभियंता प्राजक्ता गव्हाने आदी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले कि, पर्यावरणावर दररोज हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे. तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.