Chakan : भामचंद्र डोंगर परिसरात वृक्षारोपण

विद्यार्थ्यांनी लावली 300 झाडे

एमपीसी न्यूज –  पर्यावरण रक्षण ही काळाची गरज बनली आहे. जागतिक तापमान वाढ आणि अनियमित पर्जन्यवृष्टी या घटना मानवी जीवनासाठी धोक्याची घंटा आहेत. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व प्लास्टिक निर्मुलन झाले तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असे प्रतिपादन संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व माजी जि. प. सदस्य पी. टी. शिंदे यांनी शनिवारी (दि.11) भामचंद्र डोंगर येथे केले.

खेड तालुक्यात भामचंद्र डोंगर येथे ज्ञानवर्धिनी विद्यालय, भामा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्ञानवर्धिनी ज्युनिअर कॉलेज चाकण यांच्या वतीने 300 झाडे लावून विद्यार्थ्यांनी वृक्षरोपण केले. यावेळी बाजार समितीचे माजी सदस्य कल्याणशील देखणे, संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे, चाकण पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन गोरे, संतोष दरेकर, योगेश गोरे, गणेश गांधीले, मुख्यध्यापक प्रमिला गोरे, विवेक शिंदे सर, दत्तात्रय लिंभोरे , शिवाजी देठे सर्व शिक्षक सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते. स्व. गुलाबराव सोपना गोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आमदार सुरेशभाऊ गोरे मित्र मंडळाच्या पुढाकाराने झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाढवा हा उपक्रम राबविण्यात आल्याचे विकास गोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.