Pune News : शिवजयंतीनिमित्त एआरएआय टेकडीवर 101 वृक्षांचे रोपण

0
एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने ‘एआरएआय’ टेकडीवर 101 वृक्षांचे रोपण करण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक व चित्रपट सेनेचे अध्यक्ष अभिनेते गिरीश परदेशी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी सनी मानकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोथरूड प्रभाग अध्यक्ष शुभम माताळे, राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट सेनेचे सरचिटणीस संकेत शिंदे, कोथरूड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमोल गायकवाड, रवी गाडे, आकाश नागरे, सुरज आढाव आदि उपस्थित होते.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला स्वराज्य ही शाश्वत देणगी दिली. त्यामुळे त्यांच्या जयंतीला मानवंदनाही ‘शाश्वत’ पद्धतीने देण्यासाठी वृक्षोरोपण करण्यात आले. शिवजयंतीला प्रत्येकजण झाडे लावू आणि ती जगवू, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला. हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. पुण्यातील टेकड्या या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यादृष्टीने वृक्षारोपण मोहिमेच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन देखील होणार आहे, असे गिरीश गुरनानी यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.