Chinchwad : प्लास्टिकची कारवाई सुसाट, वाकडला पाच हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल

एमपीसी  न्यूज – महापालिकेकडून प्लास्टिक बाळगणा-या दुकानांवर कारवाई होत आहे, त्यात आज  वाकड व डांगेचौक येथे  पाच हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

वार्ड क्र 24 मधील वाकड फाटा ते डांगे चौक येथील 20 दुकानांची तपासणी केली असता त्यापैकी एका दुकानदाराकडे 1.500 ग्राम प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने त्यांना 5000/- रु दंड करण्यात आला व कचराबाबत 1 व्यक्ती वर कारवाई करून 500/- रु दंड वसूल करण्यात आला आहे. एकूण मिळून 5500/- रु दंड वसूल करण्यात आला आहे. ही सर्व कारवाई आरोग्य निरीक्षक एस.बी.चन्नाल व कर्मचारी वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.