Pimpri News : प्लास्टिक कचरा निर्वहन व स्वच्छता सेवा उपक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज : सेवा सप्ताह आणि स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुनावळे नगर आणि पिंपरी- चिंचवड स्वच्छता विभाग ( ब्रिक्स वेस्ट मॅनॅजमेण्ट ) यांच्या संयुक्त विद्यामाने पुनावळे गावठाण ते कोयते वस्ती चौक परिसरात प्लास्टिक कचरा निर्वहन (Pimpri News) आणि स्वच्छता सेवा उपक्रम घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक स्वच्छतेचा आग्रह,कचरा नियोजन आणि त्यांसंदर्भात प्रबोधन स्वयंसेवकांच्या माध्यमातून करण्यात आले .

या स्वच्छता सेवा उपक्रमात एकूण 43 स्वयंसेवक सहभागी झाले होते. तर प्रशासनातील 8 स्वयंसेवकांचा सहभाग होता. जवळपास 130 पोती ( जवळपास 200 किलो ) प्लास्टिक कचरा या उपक्रमाद्वारे गोळा झाला आणि  त्याच्ये निर्वहन करण्यात आले.अनेकांनी स्वयंस्पुर्ती ने या सेवा उपक्रमात सहभाग नोंदविला आणि स्वच्छग्राह सामाजिक प्रबोधनास हातभार लावला.

Pune News : हडपसर येथील जीवदान मिळालेल्या  वडाच्या झाडाचा  साताऱ्यात वाढदिवस  साजरा 

आज आपल्या उपक्रमास हिंजेवाडी गटाचे मा संघचालक राजेश जी भुजबळ, वीर चाफेकर संस्थेचे नितीन जी बारणे , अपूर्व पुनिवाला, प्रमोद दर्षले , सुमेध जावड़ेकर, प्रसून राय, गजेंद्र शिवने, सुमित गोखे, लक्ष्मण कुलकर्णी, शंतनू खंडाळकर , चिंतामनी अष्टेकर, सचिन पाटिल, विनोद चौधरी, राज पाटिल, विनोद मिश्रा, उपस्तिथ होते .

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छतादूत यांच्या मार्फत स्वच्छतेच्या सामूहिक प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले आणि स्वच्छ भारत संकल्प/ पसायदानाने उपक्रमाची सांगता झाली.

सहभागी स्वयंसेवकांचा एक व्हाट्सएप समूह निर्माण करून आपण या समूहाच्या माध्यमातून स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्यास मदत करू.या समूहाच्या माध्यमातून एक सजग नागरिक (Pimpri News) म्हणून आपल्या भागात अवैध कचरा किंवा अस्वछता असल्यास किंवा कोणी अस्वछता करताना आढळल्यास योग्य ते निर्णय घेऊ अशे आश्वासन प्रशासनाद्वारे देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.