Platform Ticket : पुणे विभागीय रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिट 50 वरुन 10 रुपये

एमपीसी न्यूज – पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिट 50 रुपयांऐवजी आता 10 रुपयांना मिळणार आहे. 1 जुलैपासून नवीन दर लागू राहणार आहेत. रेल्वे प्रशासनाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

कोरोना काळात रेल्वे स्थानकावरील गर्दीला पायबंद घालण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिट दर वाढवून 50 रुपये करण्यात आला होता. 1 जुलैपासून आता पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच रेल्वे स्टेशनवर 10 रुपये करण्यात येणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.