Pune : जनता संघर्ष दलाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी बजाओ आंदोलन

एमपीसी न्यूज – हिवाळी अधिवेशनामध्ये शैक्षणिक क्षेत्रात मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळण्याकरिता जनता संघर्ष दलाच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले आहे.

या आंदोलनात जनता संघर्ष दलाचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला, शिक्षण हक्क मंचाचे अध्यक्ष मतीन मुजावर, जनशक्ती विकास संघाचे अध्यक्ष असिफसोफी खान, बहुजन मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष गणेश भोसले, जनता संघर्ष दलाचे पुणे शहर अध्यक्ष शंकर पोटे , जनता संघर्ष दलाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चांदभाई बलबट्टी, जनता संघर्ष दलाचे महिलाध्यक्षा रशिदा शेख, शबाना खान, फरीदा मेमन, आयमान शेख, जावेद खान, सईद शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जनता संघर्ष दलाचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला यांनी सांगितले की, मंडल आयोग सुद्धा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे सांगितले आहे. आर्टिकल १६/४ प्रमाणे आरक्षण दिले पाहिजे, म्हणून राज्य सरकारने त्वरित अंलबजावणी करावी.कारण मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण संविधानाच्या चौकटीत बसत आहे, असे कोर्टाने सांगितले आहे.

मुस्लिम समाज या भारत देशाचा घटक आहे. असे बोलावे लागत आहे हे दुर्दैव आहे. मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देऊन आर्थिक दुर्बल घटकाला बरोबर घेऊन सक्षम करावे व महाराष्ट्र व देशाची प्रगती करावी. नव्या राज्य सरकारने त्वरित बिल पारित करावे. न्यायालयाच्या आदेशाची सभागृहात चर्चा व्हावी. तसे न झाल्यास अधिवेशन संपताच सरकार विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.