Players On Racism : …आणि क्रिकेट मैदानावर खेळाडूंनी केला वर्णद्वेषाचा निषेध…पाहा व्हिडिओ!

Players On Racism: ... and players protest racism on the cricket field ... Watch the video! या सर्वांनी मैदानावर वर्णभेदाच्या विरोधात 'ब्लॅक लाईव्हज मॅटर' चळवळीचे समर्थन केले. 

एमपीसी न्यूज – इंग्लंड- वेस्ट इंडीज यांच्यात साऊथॅम्प्टन येथे कसोटी सामना सुरु आहे. सामना सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचे खेळाडू तसेच पंचांनी मैदानावर गुडघे टेकले. या सर्वांनी मैदानावर वर्णभेदाच्या विरोधात ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ चळवळीचे समर्थन केले. 

अमेरिकेत पोलीस कोठडीत जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर वर्णभेद विरोध जगभर सुरू झाला. या आंदोलनाचे जगभर पडसाद उमटले. अगदी क्रिकेट विश्वात सुद्धा खेळाडूंनी या विरोधात आवाज उठवला व चळवळीला पाठिंबा दिला. लॅाकडाऊननंतर क्रिकेट पुन्हा सुरू झाले आहे. सध्या इंग्लंड-विंडीज यांच्यात साऊथॅम्प्टन येथे कसोटी सामना सुरु आहे.

या कसोटी सामन्याचा पहिला बॉल फेकण्यापूर्वीच क्षेत्ररक्षण करणारा वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू गुडघ्यावर बसला होता. इंग्लंडचे खेळाडूही गुडघ्यावर बसले. दोन्ही संघांनी त्यांच्या जर्सीच्या कॉलरवर ब्लॅक लाइव्ह्ज मॅटरचा लोगो लावला होता. आयसीसीने त्यांच्या ट्विटरवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

क्रिकेट विश्वात सचिन तेंडुलकर पासून वेस्ट इंडीजचा डॅरेन सामी, ख्रिस गेल यांनी सुद्धा वर्ण द्वेषाला विरोध दर्शवला होता. आयसीसीने सुरवातीला वर्णद्वेषाला क्रिकेट मध्ये थारा नसल्याचा एक व्हिडिओ ट्विटर शेअर केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.