Pune: मृत सेवकांच्या कुटुंबीयांना सुरक्षा कवच योजनेचा लाभ द्या : दीपाली धुमाळ

'Please include PCMC employees who died due to corona under Suraksha Kawach scheme.'- Deepali Dhumal

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजने अंतर्गत कार्यरत मृत्यू झालेल्या सेवकांच्या कुटुंबीयांना तातडीने सुरक्षा कवच योजनेचा लाभ द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे.

पुणे शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महापालिकेतर्फे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत विविध उपाययोजना सुरू आहेत.

त्यासाठी पुणे महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा कवच योजनेस मान्यता देण्यात आली आहे. ही योजना अंमलातही आणली आहे.

मृत सेवकांच्या कुटुंबीयांना सुरक्षा कवच योजनेचा लाभ देण्यासाठी मात्र विलंब लावत आहे, ही वस्तुस्थिती आहे. या योजनेची मंजुरी होऊन परिपत्रक देखील प्रसूत झाले आहे.

त्यासाठी केंद्र शासन 50 लाख, पुणे मनपा 50 लाख इतकी रक्कम आणि नातेवाईकांनी वारसा नोकरी घेतल्यास 25 लाख कमी होणार असे ठरलेले आहे.

पुणे महापालिकेच्या 13 सेवकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. 7 कर्मचाऱ्यांची प्रकरणे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे पाठविलेले आहेत. हे प्रकरण नाकारण्यात आल्याचे समजते.

वास्तविक कोरोना सारख्या महामारीच्या काळात पुणे मनपाचे सेवक काम करताना त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांना तातडीने मदत करणे आवश्यक आहे. मात्र, ते होताना दिसून येत नाही.

मृत सेवकांच्या कुटुंबांची परिस्थिती पाहता वारस नोकरी प्रकरण देखील तातडीने होणे गरजेचे आहे. पुणे महापालिकेतर्फे मयत सेवकांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने आदेश घ्यावेत, अशीही मागणी दीपाली धुमाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.