PCMC : नाट्यगृहांच्या खासगीकरणाचा डाव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) नाट्यगृहांच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. पाचपैकी चार नाट्यगृहे खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याचा डाव मांडला जात आहे. पालिकेने जनतेच्या कष्टाच्या पैशातून कोट्यवधीचे प्रकल्प उभारायचे आणि नंतर खासगी संस्थांनी त्यांचा लाभ घ्यायचा असे चित्र गेल्या काही वर्षांमध्ये पहावयास मिळत आहे.

Pune : हवामान खात्याचा सुधारीत अंदाज जाहीर, यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

महापालिकेला (PCMC) नाट्यगृह, प्रेक्षागृहावर नियमित खर्च करणे परवडत नसल्याने कारण देत प्रशासनाने पाचपैकी चार नाट्यगृहांच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. नाट्यगृह भाडे तत्वावर खासगी संस्थेच्या हवाली करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने लवकरच निविदाही काढली जाणार असल्याचे सूतोवाच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. रुग्णालय, जलतरण तलाव, व्यायामशाळा, खेळाची मैदाने खासगी संस्थांना चालविण्यासाठी देण्यात पालिकेच्या अधिकाऱ्यांना खूपच अधिक रस आहे. यावर सातत्याने टीका होत असतानाही पालिका आता नाट्यगृहे खासगी ठेकेदारांच्या ताब्यात देणार आहे.

चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह आणि प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह अशी पाच नाट्यगृहे पालिकेने उभारली आहे. या नाट्यगृहांत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच खासगी सभागृहांपेक्षा वाजवी दर आहेत. त्यामुळे या नाट्यगृहात व्यावसायिक नाटक, राजकीय कार्यक्रम, शैक्षणिक संस्थेचे स्नेहमेळावा, इतर मेळावे, समारंभ, स्पर्धा, खासगी कार्यक्रम होत असतात.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहास सोडल्यास इतर नाट्यगृहांना तितकासा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त असल्याने महापालिकेने ही नाट्यगृहे खासगी संस्थेला चालविण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. नाट्यगृहाचे संपूर्ण संचालन खासगी संस्था करणार आहे. त्या बदल्यात महापालिका निश्‍चित उत्पन्न घेणार आहे. दरमहा सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या संस्थेला नाट्यगृह चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. तो कालावधी 5 ते 10 वर्षे असू शकतो. त्यामुळे महापालिकेला (PCMC) या नाट्यगृहावर अधिक खर्च करावा लागणार नाही. उलट, दरमहा ठराविक उत्पन्न मिळणार आहे, असा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. या संदर्भात लवकरच निविदा प्रक्रिया राबवून इच्छुक संस्थांकडून दर मागविण्यात येणार आहेत.

IPL2023-गीलच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.