Khed : खेड तालुक्यात शेतकऱ्यांकडून नांगरटी सुरु

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात मे महिन्यात (Khed) बहुतांश विहीरीतील तळ गाठतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला कामच राहत नाही. वेळेचा वापर येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतजमीन नांगरून ठेवणे व ती भुसभुशीत करण्यावर शेतकरी भर देत असल्याचे चित्र खेड तालुक्यात पहावयास मिळत आहे.

खेड तालुक्यात शेतकऱ्यांनी जमिनीची नांगरट, मशागत करून ठेवली आहे. वर्षातून किमान एकदा जमिनीची मशागत करून एक महिना जमीन उन्हात तापू देणे गरजेचे आहे. जमिनीची मशागत करून म्हणजेच खोलगट नांगरट करून मातीचा खालचा थर पृष्ठभागावर आणि पृष्ठभागावरील माती खोलीवरील थरात केली म्हणजेच जमिनीची उलथापालथ केली असता, जमिनीमधील खोलवर असलेल्या किडींचे कोष उघडे पडतात.

Chakan : चाकण परिसरात गारांचा पाऊस

किडींचा बंदोबस्त होतो. याशिवाय मातीचे कण (Khed) उन्हामुळे तापतात आणि पावसाच्या पहिल्या सरीबरोबर मातीच्या कणांचे विघटन होऊन त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. यासाठी वर्षातून एकदा जमीन किमान एक महिना चांगल्या कडक उन्हात तापवणे गरजेचे असल्याचे शेतकरी सांगतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.