PM Garib Kalyan Anna Yojana : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दिवाळीपर्यंत मोफत धान्य

80 कोटी गरीबांना मिळणार मोफत धान्य

एमपीसी न्यूज – पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दिवाळीपर्यंत (नोव्हेंबर 2021) मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे दिवाळीपर्यंत 80 कोटी गरीबांना मोफत धान्य दिलं जाणार आहे.

कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीबांसाठी सरकारने मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून दर महिन्याला दरडोई पाच किलो गहू अथवा तांदूळ मोफत देण्यात येत आहे या योजनेतल्या जवळपास 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यात येत आहे.

‘मे व जूनपर्यंत लागू असलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना दिवाळीपर्यंत वाढवणार आहोत. नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार आहे. गरीबांना उपाशी झोपायला लागू नये असं,’ पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

दरम्यान, 18 वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. 18 वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लसींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.