PM Modi In Leh: जवानांचे धैर्य उंचावण्यासाठी PM मोदी अचानक लेहमध्ये दाखल

PM Modi suddenly arrives in Leh to boost the morale of the soldiers सीडीएस बिपिन रावत हेही पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत आहेत. तत्पूर्वी हवाईदल प्रमुख आणि लष्कर प्रमुखही तिथे पोहोचले आहेत.

एमपीसी न्यूज- सीमेवर भारत आणि चीन दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अचानक लडाख दौऱ्यावर गेले. पंतप्रधान मोदी लेहमध्ये दाखल झाले.  मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे लेहमध्ये गलवान येथे झालेल्या चकमकीत जायबंदी असलेल्या जवानांची भेट घेतील. मोदींच्या दौऱ्यातून चीनला हा स्पष्ट संदेशही आहे की, संपूर्ण देश लष्कराबरोबर उभा आहे.

सीडीएस बिपिन रावत हेही पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत आहेत. तत्पूर्वी हवाईदल प्रमुख आणि लष्कर प्रमुखही तिथे पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी हे गलवान खोरे म्हणजे जेथे चिनी सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली होती, तिथे ते जाणार की नाही याची अद्याप माहिती समजलेली नाही.

_MPC_DIR_MPU_II


दरम्यान, मोदींच्या दौऱ्याची अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा शुक्रवारी लेहला नियोजित दौरा होता. परंतु, गुरुवारी अचानक हा दौरा रद्द करण्यात आला होता. सीडीएस बिपिन रावत हे एकटेच लेहला जाणार होते.


पंतप्रधान मोदी सकाळी लडाख येथील नीमू येथे पोहोचले. लेह ते द्रास मार्गावर हे ठिकाण आहे. तिथे मोदी यांनी लष्कर, हवाईदल आणि आयटीबीपीच्या जवानांबरोबर चर्चा केली. हे सीमेवरील फॉरवर्ड लोकेशन आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.